
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- “एमएस धोनी भारताचा एक महान कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयसीसी स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारावर मी कर्णधारांच मुल्यमापन केलं. कारण त्यावेळीच खरी परीक्षा असते. ज्यावेळी दोन देशांमध्ये क्रिकेट सामने खेळले जातात. त्यावेळी तुम्ही ऑफिसला जात आणि परत येता. तिथे जास्त दबाव नसतो. पण आयसीसी स्पर्धांमध्ये धोनीची कामगिरी खूप मोठी आहे” असे मांजेरकर यांनी सांगितले. कसोटी क्रिकेटमधल्या आकडेवारीवरुन विराट कोहली आतापर्यंतचा भारताचा टेस्टमधला सर्वोत्तम कर्णधार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय कर्णधारांच्या यादीत कोहली चौथ्या स्थानावर आहे.
पण तरीही भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी भारताच्या सार्वकालीन महान क्रिकेट कर्णधारांच्या यादीत कोहलीचा समावेश केलेला नाही. न्यूज 18 दिलेल्या मुलाखतीत मांजरेकर यांनी त्यांच्या या निवडीमागचं कारण समजावून सांगितलं. एमएस धोनीला सर्वोत्तम भारतीय कर्णधारामध्ये त्यांनी पहिल्या स्थानावर ठेवलं आहे. एखाद्या कर्णधाराबद्दल मत बनवताना आयसीसी स्पर्धांमधील कामगिरी महत्त्वपूर्ण ठरते, असे त्यांनी सांगितले. धोनीने भारतासाठी एक नाही, तर तीन ICC स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवून दिली आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकप, 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पिय़न्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पराभव झाला.
2019 वर्ल्डकपच्या सेमीफायनल आणि 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि टी-20 वर्ल्डकपच्या साखळीतच भारताला गाशा गुंडाळावा लागला. “कोहलीच्या कधीही हार न मानण्याच्या वृत्तीचे त्यांनी कौतुक केलं. कर्णधार म्हणून त्याने उदहारण सादर केलं. पण अपेक्षित निकाल कोहलीच्या बाजूने लागला नाही” याकडे मांजरेकर यांनी लक्ष वेधलं.