
*कर्तव्यदक्ष शिक्षणविस्ताराधिकारी अमिन पठाण सर यांचा आज निरोप समारंभ संपन्न **.
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी वडेपुरी
मारोती कदम
आज दिनांक 29/ 1 /2022 रोजी सेवापूर्ती सोहळा निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम शेवडी (बाजीराव )येथे निरोप मूर्ती माननीय श्री अमीन जी पठाण साहेब शिक्षण विस्तार अधिकारी बीट : सोनखेड यांचा आयोजित केलेला होता. याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती सरस्वती अंबलवाड शिक्षण विस्ताराधिकारी बीट : सुनेगावयांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री रवींद्र जी सोनटक्के साहेब ,गावचे प्रथम नागरिक तथा शेवडीचे सरपंच श्री कैलास जी धोंडे,श्री अर्जुनजी कांबळे, मुख्याध्यापक जि प हा पेनूर .श्री मरशिवणे सर , मुख्याध्यापक महेश विद्यालय, शेवडी .भगवान सोनटक्के केंद्रप्रमुख धनगरवाडीश्री आढाव सर केंद्रप्रमुख ,साखर कारखाना ,श्री नागोराव जाधव केंद्रप्रमुख शेवडी , यांनी स्थान भूषवले.कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केंद्रीय मु . अ . श्री नरवाडे सर ,व त्यांचे सहकारी यांनी केले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सोनकांबळे सर मुख्याध्यापक ,कपिलेश्वर सांगवी यांनी केले ,यानंतर निरोप मूर्ती श्री आमीन जी पठाण साहेब यांचे सपत्नीक सत्कार करण्यात आला.श्री कलने सर ,श्री कोल्हे सर ,श्री मोरे सर ,सौ राठोड मॅडम, नागोराव जाधव ,श्री अर्जुन जी कांबळे यांनी अस्खलित इंग्लिश मध्ये प्रतिक्रिया देउन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला ,श्रीमती अंबलवाड मॅडम यांनी पठाण साहेब व रविंद्रजी सोनटक्के साहेव यांनी भावाप्रमाणे संकटकाळी साथ दिले अशी भावनीक प्रतिक्रिया व्यक्त केली .गटशिक्षणाधिकारी श्री सोनटक्के साहेब यांनी तणावमुक्त जीवन शैली आत्मसात करावी कर्तव्याप्रती प्रामाणिक राहण्याचा संदेश देउन पठाण साहेबांसोबत आलेले अनुभव सांगून पठाण साहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सर्वांनी पठाण साहेबांना भावी आयुष्य आरोग्यदायी भरभराटीचे व दीर्घायुष्य लाभो अशा शुभकामना दिल्या. खरोखरच पठाण साहेब म्हणजे कर्तव्यदक्ष अधिकारी तसेच मायाळू वृतीचे व सर्वांना सांभाळून घेणारे वेळोवेळी शैक्षणिक कार्यात मार्गदर्शन करणारे असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि आज त्यांची सेवा पूर्तता,व निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उद्धव मुळे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री ज्ञानोबा मोरे सर यांनी मानले. सह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.