
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
प्रा.यानभुरे जयवंत
कंधार :- कंधार तालुक्यातील कुरुळा सर्कल मधील दिग्रस खुर्द चे रहिवासी असलेले रामजी गोविंदराव पाटील कल्याणकर यांचे 29 जानेवारी 2022 रोजी पहाटे चार वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ग्रामीण भागातील ओबीसी नेते तथा काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते तसेच लढवय्या बाणा व जनतेवर असलेले अतूट प्रेम आणि कार्यकर्तृत्वाचा सतत सुगंध दरवळत ठेवणारे असे ग्रामीण भागाचे नेते , रामजी पाटलाचे स्मित हास्य तसेच बोलण्यातील भारदस्त रुबाब लढण्याची ताकद आणि पक्षातील एकनिष्ठ पणा असे गुण कोणीही विसरू शकणार नाही.
रामजी गोविंदराव पाटील कल्याणकर यांनी कंधार पंचायत समितीचे उपसभापती तसेच दिग्रस ग्रामपंचायतचे अविरत सरपंच आणि श्री नाईक विद्या मंदिर दिग्रस खुर्द शाळेचे अध्यक्ष असे अनेक पदाच्या माध्यमातून समाजाची सेवा केली आहे या पदाच्या माध्यमातून व काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या माध्यमातून गोरगरिबांची कामे करून एक आदर्श समाजापुढे कायम ठेवला आहे याची कल्पना कंधार तालुक्यातील सर्व तळागळातील लोकांना असून ती कायम पुढे राहणार व त्यांची उणीव सर्व जनतेला नक्कीच भासणार हे मात्र तेवढेच खरे आहे.
रामजी गोविंदराव पाटील कल्याणकर म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्व अतिशय मेहनती व प्रामाणिक आणि सर्वसमावेशक असे नेतृत्व अशा विविध गुणांनी नटलेले व्यक्तिमत्व आणि समाजातील अतिशय प्रतिष्ठित व मोठे नेतृत्व आज ईश्वराने आपल्यातून हिरावून नेलं त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो व कल्याणकर परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना सन्मान्य जनतेतून केली जात आहे. रामजी गोविंदराव पाटील कल्याणकर यांच्या पश्चात मुले मुली नातवंडे असा खूप मोठा परिवार असून कल्याणकर परिवाराच्या दुःखात कंधार तालुक्यातील संपूर्ण जनता सहभागी राहणार हीच त्यांना आदरांजली आहे.