
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पोलीस विभागाला हाईटेक बनविण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले असून त्यांनी “क्यूआर कोड” चा उपयोग करून सुरक्षा यंत्रणा अत्याधुनिक बनविण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या निर्देशावरून धारणी येथील ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे व त्यांच्या पथकाने शहरात जवळपास अकरा ठिकाणी “क्यूआर कोड” लावून हाईटेक सुरक्षा संकल्पनेला साकार केले आहे.
धारणी शहरातील तहसील कार्यालय, बस स्थानक, फॉरेस्ट नाका,बँक,एच.पी पेट्रोल पंप, मेळघाट टॉकीज,सीताराम नगर,नेहरू नगर,भोकरबर्डी व कुसुमकोट बु. च्या दर्शनी भागात हा “क्यूआर कोड” लावण्यात आलेला आहे.पोलीस पथक गस्त घालीत असेल त्यावेळी “क्यूआर कोड” च्या माध्यमातून त्यांच्या लोकेशन अवगत होईल. अमरावती ग्रा.पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मेळघाट दौऱ्या दरम्यान त्यांनी धारणी येथील ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे व त्यांच्या पथकाचे कौतुक केले.