
दैनिक चालु वार्ता
कोरपना तालूका प्रतिनिधी
प्रदिप मडावी
-यशाचे शिखर गाठायचे असेल तर पाय भरकटू देऊ नका*
-गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापुरावजी मडावी यांचे प्रतिपादन
कोरपना :-कोरपना समुद्रात भरकटलेल्या जहाजाला जशी दिशा शोधावी लागते, त्याचप्रमाणे गोंडीयन समुदायाला विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी सृजनशिल मार्गदर्शनाची गरज आहे. विकासाचा मार्ग खरतड असला तरी अशा प्रबोधनामधूनच यशाची एक-एक पायरी चढता येते. आपणास यशाचे शिखर गाठायचे असेल तर पाय व मन भरकटू देऊ नका, कारण आपण स्पर्धेच्या व डिजिटल युगात वावरत आहोत. त्यामुळे मन व चित्त एकत्र ठेवून शिक्षणाचे सातत्य टिकविल्यास तुम्हाला तुमच्या ध्येया पासून कुणीच परावृत्त करू शकत नाही असे मौलिक मार्गदर्शन गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापुरावजी मडावी यांनी कुकुडसाथ येथिल कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात केले.
गोंदोला- सामाजिक उपक्रमांच्या पिसाना समाजलासी म्हणजे जगावे समाजासाठी हा उदात्त हेतू समोर ठेवून गोंडीयन समाज मंडळ कुकूडसाथ यांनी सल्लेर-गांगेर शक्तीपीठाचे अनावरण कार्यक्रमा निमित्त समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापुरावजी मडावी तर उद्घाटक म्हणून कळमनाचे सरपंच तथा काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्राम आरोग्य सेना फॉउंडेशन चे संस्थापक डॉ. प्रविण येरमे, माजी समाजकल्याण सभापती जि. प. चंद्रपूर निलकंठराव कोरांगे, भारत आत्राम गौरव भोयर,सरपंच वंदनाताई चवले, उपसरपंच आस्वले, पो. पा. जितेंद्र मुठ्ठलकर, तंटामुक्ती अध्यक्ष रंजन लखमापुरे, गाव सुधार समिती अध्यक्ष वासुदेवजी बोधे, प्रतिष्ठीत नागरिक यशवंतराव जी चवले, युवा नेतृत्व किशोरजी निब्रड प्रमुख पाहुणे म्हणून लिंगोमंचावर विराजमान होते.
सामाजिक बांधिलकी काय असते हे कुकूडसाथ ग्रामवासीया कडून शिकले पाहीजे. जगावे समाजासाठी यांचा प्रत्येय इथे पहायला मिळाला त्याबद्दल कार्यक्रम अध्यक्ष मडावी यांनी ग्रामस्थांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले. पिसाना समाजलासी या वाक्याला सार्थक ठरविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले असून, समाजाची संस्कृती, ऐक्य, सामाजिक भावना वृध्दींगत व्हावी या उदात्त हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्रास्ताविकेतून शंकर आत्राम यांनी मांडले. संचालन व आभारप्रदर्शन श्री. गर्जेहर यांनी केले. यशस्वीतेसाठी शंकर आत्राम, देवाजी आत्राम, भाऊराव सोयाम, प्रमोद आत्राम, मिनाताई आत्राम, संदिप परचाके, दौलत टेकाम, विक्की आत्राम, सुरज सोयाम, नितेश आत्राम, अजय आत्राम, सौरभ आत्राम यांनी परिश्रम घेतले.