
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- २६ जानेवारी २०२२ ला प्रजासत्ताक दिनानिमित्त उपजिल्हा रूग्णालय दर्यापूर येथे प्रहार विद्यार्थी संघटना व शाळा/महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फळ वाटप व स्वच्छता अभियानाचा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात राबविला. आजच्या परिस्थितीत कोरोनाचा अभावी शाळा/महाविद्यालय बंद असतांना विद्यार्थ्यांचा व युवकांचा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उत्साह कमी होऊ नये व तसेच स्वातंत्र्य सैनिकांनी मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याला अभिवादन म्हणून भारतीय सैनिक अभिजीत टेकाडे यांच्या उपस्थितीत हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
तसेच लासुर येथील शहीद जवान भुषन भारत आठवले यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांच्या माता-पित्यांचा सत्कार प्रहार विद्यार्थी संघटना दर्यापूरच्या वतीने करण्यात आला. यावेळी भारतीय सैनिक अभिजीत टेकाडे प्रहार विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते तेजस गणेशपुरे, निखिल पाटिल वानखडे, अनंता शेकोकार, अक्षय मालठाने, आशिष गोळे, पवन वाकोडे,अविनाश पाटील,आदित्य शेळके, विनोद वाडेकर,ओम रामेकर,अभय कैथवास, प्रतीक नितनवरे, प्रथमेश खराडे, शिवा बुध,विजय खडे,रोशन खडे,राहुल इंगळे,गणेश सुरजुसे,ओम शिरनाथ आदी उपस्थित होते.