
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी
अ.दि.पाटणकर
पुणे :- राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असतानाच काही दिवसांपूर्वी शाळा महाविद्यालये सुरु करण्याबाबतचे अधिकार महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनाला दिलेले होते त्याप्रमाणे महाराष्ट्रातील काही ठिकाणची शाळा महाविद्यालये सुरु झाली होती मात्र पुण्यातील शाळा महाविद्यालये सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सावध भूमिका घेतली होती.
त्यामुळे पुण्यातील शाळा महाविद्यालये सुरु झाली नव्हती आता मात्र उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठकीत पुण्यातील शाळा महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याची घोषणा केली आहे मात्र पुण्यातील शाळा महाविद्यालये सुरु करताना शाळांना आणि विद्यार्थ्यांना काही कडक बंधने पाळावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. या नियमावलीस आधीन राहून शाळा, महाविद्यालये सुरु राहतील.
शाळांमध्ये पाठवण्याचा निर्णय संपूर्ण पालकांचा असणार शाळा फक्त चार तासच चालू राहतील. विद्यार्थ्यांना शाळेत महाविद्यालयात पूर्णवेळ मास्क घालावा लागेल. पालकांनी विद्यार्थ्यांना मास्कचं बंधन करावं.९वी पासून पुढच्याच्या शाळा पूर्णवेळ सुरू राहतील. १ ली ते ८वी पर्यंतच्या शाळा चार तास ५० टक्के क्षमतेने भरवल्या जातील.