
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर :- काल सायंकाळी 7 वाजे दरम्यान साम्राज्य ग्रुपचे सदस्य सलमान शेख व रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ हे गंगापूर भेंडाळा मार्गाने गंगापूर कडे येत असताना विराज हॉटेल समोर रस्त्याच्या मध्यभागी जखमी अवस्थेत हरीण पडलेली दिसली. यातील सलमान शेख यांनी साम्राज्य ग्रुपचे अध्यक्ष जूबेर पठाण, यांना संपर्क करून सदरील माहिती दिली. त्यांनी तत्काळ जखमी असलेल्या हरणीला गंगापूर पोलीस ठाणे येथे घेऊन येण्यास सांगितले.
ते स्वतः आणि त्यांचे सहकारी अरबाज शाह, रिजवान खाँन यांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक संजय लोहकरे साहेब यांना घटनेची माहिती दिली. लागलीच लोहकरे साहेबांनी गंगापूर-वैजापूर चे वनपाल दिलीप तेरके यांना सांगून वन विभागाचे वन मजूर यांना पाचारण करून जखमी हरीण त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.