
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
प्रा. मिलिंद खरात
पालघर :- आज दिनांक 29 रोजी आपले मानवाधिकार फाऊंडेशन व लायन्स क्लब कल्याण तर्फे वाडा पि. जे. हायस्कूल येथे मोफत आरोग्य शिबिरा चे आयोजन केले होते.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात वाडा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने तपासणी साठी उपस्थित होते. या शिबिरात पूर्ण शरीराची तपासणी मोफत मशीनव्दारे करण्यात आली .त्याच बरोबर शुगर, बीपी, डायबेटीस, रक्त तपासणी करण्यात आली लायन्स क्लब चे कल्याण प्रमुख डॉ. जाधव तसेच त्याची पूर्ण टीम उपस्थीत होती. तसेच अपर्णा लोखंडे व कोमल डोगरा मैडम यांनी या शिबिरा साठी विशेष प्रयत्न केले.
या शिबिरासाठी पि. जे. हायस्कूल चा हॉल मा. प्राचार्य श्री. आर. एस. पाटील सर यांनी उपलब्ध करून दिला. तसेच या शिबिरात पि. जे. हायस्कूल व आ. ल. च. कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक ,प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या शिबिरात तपासणी केली. या शिबिराच्या आयोजनात आपले मानवाधिकार फाऊंडेशन पालघर जिल्हा कार्यकारणी चे विशेष योगदान होते. संचालक श्री. डॉ. पष्टे सर हे जातीने हजर होते. त्याच बरोबर आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे पालघर जिल्हा जिल्हाध्यक्ष श्री. मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रमुख श्री. सागर पाटील उपस्थित होते. यावेळी आपले मानवाधिकार फाऊंडेशन तर्फे लायन्स क्लब कल्याण चे प्रमूख डॉ. जाधव यांना व पि. जे. हायस्कूल वाडा,व आ. ल. च. कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक सन्मानीय श्री.आर. एस. पाटील सर यांना तसेच ठाणे -पालघर ग्रामीण सामाजिक शैक्षणिक संस्था चे डॉ. वीरेंद्र भोईर सर यांना आपले मानवाधिकार फाऊंडेशन दिनदर्शिका व रयतेचा कैवारी दिवाळी अंक आपले मानवाधिकार फाऊंडेशन चे संचालक डॉ. पष्टे सर, पालघर जिल्हाप्रमुख श्री .सागर पाटील. व पालघर जिल्हाध्यक्ष मिलिंद खरात यांच्या हस्ते भेट देण्यात आला.