
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- दिनांक २८/०१/२०२३वार शुक्रवार रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझन यांच्यावतीने भालचंद्र ब्लड बँक येथे आयोजित कार्यक्रमात श्री. रामेश्वर सगरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना,”राष्ट्रीय निर्माता पुरस्कार देऊन” सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत तत्त्वज्ञ प्राचार्य नागोराव कुंभार यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रोटरी डिस्टिक गव्हर्नर डॉक्टर ओम प्रकाश मोतीपवळे सहाय्यक प्रांतपाल डॉ. सुचित्रा भालचंद्र रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय गवई रोटरी क्लबचे सचिव निळकंठ स्वामी प्रोजेक्ट चेअरमन प्रा.गुणवंत बिराजदार त्याचबरोबर निजाम शेख या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सगरे रामेश्वर सर यांना गौरवण्यात आले.
हा पुरस्कार रोटरीचा मानाचा पुरस्कार मानला जातो यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळांच्या व सामाजिक क्षेत्रातील अठरा व्यक्तीचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमास रवी कुमार शिंदे प्रशांत वाघमारे सुधीर सातपुते डॉक्टर विजय राठी तेजमल बोरा माधव गोरे माधव पांडे व सन्माननीय सदस्य उपस्थित होते त्यांच्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.