
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
आता पर्यंत मोबाईल रिचार्ज वैधता २८ दिवसाची होती, मात्र TRAI ने घेतलेल्या निर्णयानुसार मोबाईल रिचार्ज वैधता आता 30 दिवसाची असणार तसेच याबाबतचे आदेश TRAI ने मोबाइल रिचार्जे कंपन्यांना दिले आहेत.
पहा काय सांगितले TRAI ने ?
TRAI म्हणजेच भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण ने दिलेल्या माहितीनुसार , सध्या टेलिकॉम कंपन्या प्रीपेड सेगमेंटमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन देतात. त्यामुळे ग्राहकांना एका वर्षात 13 रिचार्ज करावे लागतात याबाबत मागील काही दिवसांत अनेक यूजर्सकडून ‘ट्राय’कडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना प्रीपेड ग्राहकांसाठी आता 30 दिवसांची वैधता असणारे रिचार्ज प्लॅन्स द्यावे लागणारअसे आदेश ‘ट्राय’ने या कंपन्यांना दिले आहेत.