
दैनिक चालु वार्ता
खंडाळी सर्कल प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी :- जि.प.शाळा धसवाडी ता.अहमदपुर येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी एक मताने मा.श्री इंद्रजित शिवराम आयलवाड यांची एकमताने निवड झाली आहे. त्याबद्दल ग्रा.पं.सरपंच प्रेमचंद दिगंबरराव दुर्गे,पोलिस पाटील श्री अंगद जम्मलवाड,माजी सरपंच आणि लोकप्रिय व्यक्तीमत्व मा. अविनाश देशमुख,माजी अध्यक्ष श्री गणपती क्षीरसागर,गोविंद पवार,रमाकांत घोडके,अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
पालक व विद्यार्थी यांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.ही बातमी समजल्यानंतर पुणे येथून श्री इंद्रजित आयलवाड यांचे नारायण दुर्गे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती धसवाडी यांनी फोन करुन अभिनंदन केले आहे व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.नविन अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.