
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
हिवाळ्यात अनेकदा सर्दी, डोकदुखी नि घसा खवखवण्याची समस्यांना सामोरे जावे लागते. घशाच्या दुखण्यामुळे बोलण्यात, खाण्यात अडचणी येतात. अशा वेळी तातडीने उपचार न घेतल्यास हा आजार बळावू शकतो. घशात संसर्ग झाल्यास शक्यतो तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यायला हवीत. मात्र, डाॅक्टरांकडे जाणे शक्य नसल्यास काही घरगुती उपायही करता येतात. शिवाय, या काळात काही पदार्थ खाणेही टाळायला हवे.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…
तळलेले पदार्थ
घसा दुखत असल्यास तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नका. तेलकटपणामुळे घसा खवखवण्याचा त्रास आणखी वाढू शकतो. या काळात तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नका.
दुग्धजन्य पदार्थ
घशाचा संसर्ग असल्यास दुधाचे सेवन हानीकारक ठरू शकते. या काळात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास कफ वाढतो. त्यामुळे दूध प्यायचे झाल्यास, गरम दूध हळद घालून प्या.
थंड पदार्थ
थंड पेय, थंड पाणी, फ्रीजमधील थंड पदार्थांमुळे घशातील कफ आणखी वाढतो. आयुर्वेदानुसार थंड पेयामुळे घशाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे थंड पदार्थ टाळायला हवेत..
हे उपाय करा
मिठाच्या पाण्याने गुळण्या:- घशाचा त्रास दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. त्यामुळे घशात जमा झालेला कफ निघतो. घसा साफ केल्याने संसर्ग दूर होण्यास मदत होतो.
ज्येष्ठ मध :- घसा दुखीवर ज्येष्ठ मध रामबाण उपाय आहे. ज्येष्ठ मधाचा तुकडा चघळत राहा. त्यामुळे घसा दुखीची समस्या दूर होईल. तुम्ही लिकोरिस पावडरचे पाणीही पिऊ शकता.
तुळस :- तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी सेप्टिक गुण असतात. तुळशीची पाने पाण्यात उकळा व या पाण्याने गुळण्या करा. तुळशीच्या पानांचा चहाही फायदेशीर ठरतो.
लवंग आणि काळी मिरी :- लवंग, काळी मिरीचे सेवन घशासाठी फायदेशीर आहे. एक ग्लास कोमट पाण्यात लवंग, काळी मिरी पावडर आणि मध मिसळा. हे पाणी काही दिवस सकाळी प्या.
टीप : वरील माहिती हि प्राथामिक स्वारुपाची आहे वेळोवेळी डाँ सल्ला घ्या.