
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- औरंगाबाद शहरातील अँम्ब्युलन्स हेल्प रायडर्स एक नोंदणीकृत सेवाभावी संस्था आहे . औरंगाबाद शहरात या ग्रुपचे संपूर्ण शहरभर स्वयंसेवक आहेत . शहराच्या प्रत्येक भागात हे जाळे पसरलेले आहेत . शहरात अनेक समाज उपयोगी उपक्रम कायम राबवत आलेलो आहे . यावर्षी भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे अमृत म्होत्सवी वर्ष होते . त्या निमित्ताने देशात अनेक उपक्रम राबविले जात आहेत .अँम्ब्युलन्स हेल्प रायडर्स परिवाराने सुद्धा २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्थे मार्फत “ प्रयत्न हेल्प रायडर्स चा संकल्प सुरक्षिततेचा ” हे अभियान कोविड – १९ च्या सर्व नियमांचे पालन करत राबवले गेले .
या उपक्रमा अंतर्गत औरंगाबाद येथील मुख्य मानला जाणाऱ्या जालना रोड वरील प्रमुख ०९ ते १० चौकांमध्ये म्हणजेच बाबा पेट्रोल पंप पासून ते केब्रिंज पुल पर्यंत प्रत्येक चौकात एक ग्रुप लीडर आणि ९ स्वयंसेवक अशी १० जणांचा संघ मिळून हातात फलक घेऊन जनजागृती अभियान राबवले गेले . या मध्ये प्रामुख्याने वाहतूकीचे नियम , कोवीङ-१९ चे नियम , रक्तदान , लसिकरण या बाबत फलक हातात घेऊन सिग्नल वरती व चौकात जनजागृती केली गेली .
या मध्ये अपघात ग्रस्तांना त्वरीत मदत मिळणे व वाहतूक कोंङी मधून रूग्णवाहिकेला रस्ता दयावा हे मुख्य मुद्दे होते . या उपक्रमा दरम्यान कोवीङ – १९ चे सर्व नियम पाळत गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली . या कार्यक्रमास औरंगाबाद मधील नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. क्रांतीचौक येथे सर्व स्वयंसेवक एकञ मिळून ध्वजस्तंभाला वंदन करून या अभियानाचा समारोप करण्यात आला . या उपक्रमात संपूर्ण औरंगाबादकरांना सुरक्षिततेबाबत जागरूक करणे हाच मुख्य उद्देश होता . प्रत्येक चौकात हातात फलक घेतलेले सदस्य नागरिकांना वाहतूक व सुरक्षिततेबाबत संदेश देऊन जागरूक करत होते .
प्रत्येक चौकात एकाच वेळेस व्यापक प्रमाणात उपक्रम पहिल्यांदाच राबविला जात असल्याने यास औरंगाबाद करांनी प्रचंड प्रतिसाद दिला. लोकहितासाठी असेच उपक्रम आम्ही भविष्यात राबिविणार आहोत अशी माहिती मुख्य समन्वयक उपक्रम राबविण्यात मुख्य समन्वयक संदीप कुलकर्णी यांनी दिली . तसेच सर्वच समन्वयकांनी भरपूर मेहनत व परिश्रम घेतले म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात ही चळवळ उभी राहिली व उपक्रम यशस्वी झाला असे त्यांनी सांगितले .
७८ वर्षाच्या पङवळे आजीं पासून ८ वर्षाच्या युवराज सह अनेकजण कार्यरत –
अँम्ब्युलन्स हेल्प रायडर्स च्या या परिवारात अनेक सदस्य आहेत . या उपक्रमा मध्ये सर्वात वरिष्ठ स्वयंसेवक ७८ वर्षाच्या शारदा पङवळे आजीं पासून ते ८ वर्षाच्या युवराज देवानंद मनगटे सह अनेक जण सहभागी होते हे विशेष .
शहर वाहतूक पोलीसांची यशस्वी साथ –
प्रत्येक चौकात शहर वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस कार्यरत होते . चौकात सुरूवातीला भारत मातेच्या प्रतिमेला वाहतूक पोलीसांच्या हाताने पुष्पहार घालून सलामी देत या उपक्रमाची सुरूवात झाली . वाहतूक पोलीस या विशेष कार्यांने भारावून गेले व त्यांनी सर्व समन्वयकांचे कौतुक केले . तसेच भविष्यात काहीही मदत लागल्यास सदैव सोबत आहोत ही हाक दिली .
खासदार , नगरसेवक तसेच सर्व पक्षीय नेते सहभागी –
अँम्ब्युलन्स हेल्प रायडर्स च्या “ प्रयत्न हेल्प रायडर्स चा , संकल्प सुरक्षिततेचा ” या उपक्रमात सर्व पक्षाचे नेते , खासदार , नगरसेवक यांनी सदिच्छा भेट दिली . तसेच उपक्रमात सहभागी होऊन सर्व रायङर्स् चे कौतुक करत अभिनंदन केल व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .