
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
रामेश्वर केरे
लवकर औषधे उपलब्ध करून द्या नसता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालणाला टाळे ठोकणार….संतोष पाटील जाधव माजी बांधकाम सभापती
गंगापूर :- गंगापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या दोन महिन्यापासून औषधी व गोळ्यांचा तुटवडा असून गोळ्या-औषधे कधी येतील याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शेळके याना याबाबत विचारले असता आणखी आठ ते दहा दिवस गोळ्या औषध उपलब्ध होण्यासाठी लागतील असे सांगितले. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माता निलेश शेळके यांना माहिती विचारले असता त्यांनी माहिती दिली की गेल्या दोन महिन्यापासून खोकला व ताप यावरील औषधांचा तुटवडा असून अनेक विविध आजारावरील औषधांचा तुटवडा आहे.
याबाबत वारंवार औषधांची व गोळ्यांची मागणी केली आहे मात्र अद्यापही आम्हाला काही आजारावरील गोळ्या औषध सोडले तर औषधांचा पुरवठा झालेला नाही मात्र साठ हजार लोकसंख्या असलेल्या व 40 ते 50 खेडे या प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडलेली असतानासुद्धा गोळ्या औषध न मिळाल्याने ऐन कोरणा काळामध्ये गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे व लवकरच दहावी व बारावीच्या परीक्षा येतील व शाळाही सुरू झाल्या आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांना 15 ते 18 वयोगटांच्या विद्यार्थ्यना कोव्हक्सींन देणे गरजेचे आहे मात्र त्या लसेसही उपलब्ध नाही याची माहिती कळताच माजी सभापती संतोष पाटील जाधव यांनी लासुरचे आरोग्य केंद्र गाठले व माहिती घेतली असता अनेक औषधी व गोळ्यांचा तुटवडा असल्याची माहिती मिळाली यावेळी प्रतिक्रिया देताना संतोष पाटील जाधव म्हणाले की या प्राथमिक आरोग्य केंद्रात गोळ्या औषधांचा पुरवठा लवकर न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.