
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
शिऊर :- नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील एका तरुण शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २८ जानेवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. सोमनाथ एकनाथ बारहाते (३५) असे मृताचे नाव आहे. या शेतकऱ्याला तीन एकर शेती आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व मागील वर्षी कमी-अधिक पाऊस झाल्याने शेतीतून समाधानकारक झाले नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालविणे शेतकऱ्याला कठीण झाले होते.त्याची परीस्थिती खुप हालिखिची आहे सरकारकडुन काही मदितिची गरज आहे आसे ग्रामास्थाचे म्हणने आहे.