
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कलंबर
हनमंत शिरामे
कलंबर :- येथील कै. बळीराम पाटील प्राथमिक शाळा भोपळवाडी (कलंबर) ता. लोहा या शाळेत आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७४ वी पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना बापुजींच्या दिल्ली येथील राजघाट समाधीस्थळांवरील अमरज्योत तेवत असलेली चित्रफित दाखवून मुख्याध्यापक माधवराव भोपाळे सर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी संपूर्ण माहिती सांगितली.