
दैनिक चालु वार्ता
शहादा ग्रामीण प्रतिनिधी
पूनम पवार
नवापूर :- नवापूर तालुक्यातील निंबोणी गावालगत चारचाकी व दुचाकीचा अपघात झाला. यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला नंदूरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नवापूर तालुक्यातील विसरवाडी खांडबारा रस्त्यावर निंबोणी गावालगत चारचाकी व दुचाकीचा अपघात झाल्याने सोमनाथ सूकलाल कोकणी वय 25रा.मेहंदी पाडा या युवकाला डोक्यावर हाता पायाला गंभीर इजा झाली असल्याने त्याला तात्काळ खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचार करून इजा गंभीर असल्याने नंदूरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती खांडबारा पोलिस प्रविण आहिरे यांना मिळाली असता त्यांची अगोदर 108ला पाचारण करून घटनांची एॅम्बुलन्सला माहिती दिली. त्यानंतर तात्काळ पोलिस प्रविण आहिरे प्रशांत पाटील घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी पुढील तपास विसरवाडी पोलिस निरीक्षक नितिन पाटील यांच्या मागॅदशॅनाखाली खांडबारा पोलिस करीत आहे.