
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी
सुशिल घायाळ
मंठा :- दि.29 बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील भाग 4 कलम 21 नुसार प्रत्येक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येते त्यानुसार मंठा तालुक्यातील वायाळ पांगरी येथे कोरोना चे सर्व नियम पाळून शालेय व्यवस्थापन समितीची पालक बैठक बोलवण्यात आली होती.त्यानुसार सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर बाबासाहेब वायाळ तर उपाध्यक्षपदी सो.आशामती प्रसाद वाकळे यांची निवड करण्यात आली. या समितीने सर्वांना असा विश्वास दिला की, शालेय गुणवत्ता वाढवने व मुलांचे भवितव्य उज्वल व्हावे. व शालेय व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता यावी.
शाळाबाह्य व अपंग मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, पायाभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, शिक्षकांच्या समस्याचे निराकरण करणे व त्यांच्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे,शालेय विकास आराखडा तयार करणे, या सर्व गोष्टीवर भर देऊन निश्चितच शालेय गुणवत्ता वाढवू अशी हमी दिली. या निवडीबद्दल माजी पंचायत समिती सभापती गंगाधररावजी वायाळ, सुनीलराव वायाळ, युवराज वायाळ, दतराव वायाळ, प्रभाकर वायाळ, कैलास वायाळ, राहुल वायाळ, अंकुशराव वायाळ , ग्रामस्थ,पालक, यांनी अभिनंदन केले. तसेच यावेळी केंद्रप्रमुख बागल सर, मुख्याध्यापक आडे सर, सर्व शिक्षक गावकरी,पालक, उपस्थित होते.