
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे
गंगापूर :- गंगापूर तालुक्यातील नांगरे बाभूळगाव येथील अशोक पाटिल वरकड यांची आज दि 29/01/2022 रोजी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत औरंगाबाद जिल्हा प्रमुख पदी अशोक वरकड पाटिल यांची पुनर्रनियुक्ती करण्यात आली, असून संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष दादा चौधरी यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल भाउ पाटील व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन भगत साहेब यांच्या सुचनेनुसार ही नियुक्ती केली,असून वरकड पाटिल यांचें महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बलजित सिंग लांबा मराठवाडा सल्लागार विकास मुठाळ पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश निकम, जिल्हा सचिव सुरेश गव्हाणे, यूवा जिल्हा अध्यक्ष तेजस आरखडे, जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ कुसुमताई वेताळ,गंगापूर तालुका अध्यक्षा महीला आघाडी प्रिती ताई संदिप मेहेरे, औरंगाबाद पुर्व तालुका अध्यक्षा मंगलताई गांजकर, सदस्य सोमनाथ घोरपडे, कन्नड तालुका प्रमुख सुनिल भाउ दाभाडे, कमलाकर भाउ चौधरी, तालुका सचिव भागीनाथ रावते, वैजापूर तालुका प्रमुख मजनू पठाण, खुलताबाद तालुका प्रमुख नानासाहेब साळुंके, पैठण तालुका प्रमुख विठ्ठल सोनवणे ,औरंगाबाद पुर्व तालुका प्रमुख कैलास बनकर, गंगापुर तालुका प्रमुख बापू सोमासे, तालुका सचिव गोकुळ दंडगव्हाळ, खुलताबाद युवा तालुका प्रमुख जगदिश ठेगडे, खास पटेल आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.