
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड :- 31 जानेवारी 2022 सोमवारपासून नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा , खाजगी संस्था , इंग्लिश मीडियम स्कूल सुरू होणार आहेत नांदेड जिल्ह्यात व तालुक्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी बऱ्याच दिवसापासून हालचाली सुरू होत्या covid-19 ची सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्र शासनाने शाळा सुरू करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी , जिल्हा परिषद , शिक्षण विभाग भारतात स्थानिक प्रशासन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात व सर्व तालुक्यात परिस्थिती पाहता इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे सर्व वर्ग भरण्यास शाळेला परवानगी देण्यात आली आहे या बाबतचे परिपत्रक नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनी काढलेले आहे सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी covid-19 चे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून सर्वच शाळा भरवाव्यात व विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करून शाळेत यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत च्या सर्व माध्यमाच्या शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय 07 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येणार आहे गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे लवकरात लवकर इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात यावे अशी मागणी पालकांकडून केली जात असल्यामुळे यावर निर्णय 7 फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.