
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी २६ जानेवारी रोजी च्या वाढदिवसानिमित्त देऊळ गल्ली येथील श्री. बालाजी चरणी आपले तिन वर्षाचे मानधन अर्पण केले. देवभुमी म्हणून परिचित असलेल्या देऊळगल्ली येथील श्री. बालाजी मंदिर समितीकडे लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी शासनाकडून मिळणारे तिन वर्षाचे मानधन ४ लाख ७९ हजार ८७९ रुपये चा चेक बालाजी चरणी अर्पण केले. पुढील दोन वर्षाचे मानधनही बालाजी चरणी अर्पण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बालाजी मंदिर समितीच्या वतीने नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा केक कापून वाढदिवस साजरा करुन निरोगी दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित श्री. बालाजी मंदिर समितीचे अध्यक्ष हरि अंबेकर, बंडोपंत पेनुरकर, प्रशांत मक्तेदार, गिरीष ढगे, लक्ष्मीकांत सुर्यवंशी, गंगाधर सावकार सुर्यवंशी, नागन आप्पा किलजे, प्रभाकर किटे, संजय चालिकवार, अशोक चालिकवार, दिपक पिंगळे, अजित काळेगोरे, हिरालाल घंटे, सोमनाथ भोसकर, पांडुरंग रहाटकर आदी उपस्थित होते.