
दैनिक चालु वार्ता
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी
महेंद्र नांगरे
करंजाळा :- करंजाळा ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामे होत नसल्या कारणाने ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला. ग्रामपंचायत सदस्य यांच्या अर्जावरून असे लक्षात येत आहे की ग्रामपंचायत अंतर्गत होणारे विविध विकास कामे सरपंच ग्रामसेवक हे जाणून बुजून बौद्ध वस्तीतील विकास कामे करत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेऊन विकास कामे करण्याचे ठरवले असून सुद्धा सरपंच व ग्रामसेवक टाळाटाळ करत आहेत .
बौद्ध वस्तीतील पाण्याची टाकी नादुरुस्त झाली ती व्यवस्थित करत नाहीत अशी तक्रार वेळोवेळी करूनही सरपंच त्याकडे लक्ष देत नाही, तसेच वार्ड क्रमांक 03 व 04 यामधील रस्त्याचे काम निधी उपलब्ध असूनही केले नाही , वार्डमधील नाल्याची सफाई कामगार लावून सफाई न केल्या कारणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे व ग्रामपंचायत ने सर्वजनिक पाणीपुरवठ्याची पाईपलाईन दोन महिन्यापासून खोदून ठेवली आहे तिचे काम इस्टिमेट प्रमाणे होत नसल्यामुळे धूळ खात पडले आहे. खोदलेल्या नाली मुळे गावातील वाहनांचा अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही व बौद्ध वस्तीकडे जाणारा रस्ता करून देण्यात यावा अशी मागणी दलित वस्तीतील ग्रामस्थ करीत आहे .
करंजाळा बाराशिव संयुक्त ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत अंतर्गत बाराशिव येथे स्मशानभूमी साठी जागा मागणी केली असता ग्रामपंचायत व प्रशासनाकडून कुठलाही तोडगा काढला नाही ग्रामस्थांनी वेळोवेळी तसिल कार्यालय येथे ग्राम विकास कामे करण्यासंदर्भात व स्मशान भूमी जागा मिळण्याबाबत निवेदन देऊनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने 07फेब्रुवारी रोजी अमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे .