
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- देशी बनावटीच्या पिस्टलसह एका आरोग्य कर्मचा-यास पोलिसांनी बिलोली रुग्णालयातून गजाआड करून त्याच्याकडून गावठी पिस्टल जप्त करण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. वजीराबाद येथील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना दिनांक १९ जानेवारी रोजी गोवर्धनघाट परीसरामध्ये एक ईसम आपले ताब्यात देशी पिस्टल बाळगुन लोकांना धमकावित होता,अशी माहिती मिळाली.
यानूसार दिनांक २४ रोजी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पिस्टल बाळगणा-या गुन्हेगाराचे नांव निष्पन्न ग्रामीण रुग्णालय बिलोली येथुन ताब्यात घेतले. यानंतर त्याने एक देशी पिस्टल नांदेड येथे असल्याचे कळवून ती पंचासमक्ष काढुन दिल्याने ती जप्त केली आहे. सदर प्रकरणी पोहेकॉ दत्तराम जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या फियार्दीवरुन आरोपीविरुध्द भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमेश मदनसिंग बीडला (वय २९ वर्ष, राहणार जुना कौठा नांदेड) असे आरोपीचे नाव असून तो आरोग्य विभागात कार्यरत आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि संजय निलपत्रेवार हे करीत असुन आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.