
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
माळेगाव (नांदुरा) :- मलकापूर विधानसभा मतदार संघात मलकापूर व नांदुरा तालुक्यामध्ये सत्तापरिवर्तन नंतर आमदार राजेश एकडे यांच्या रूपाने विकासाची गंगा काय असते याचा साक्षात्कार मलकापूर मतदारसंघातील मतदारांना दिसत आहे गेल्या दोन वर्षापासून आमदार राजेश एकडे यांच्या अथक प्रयत्नातून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण ही कामे वेगात सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 30 जानेवार रोजी माळेगाव गोंड येथे नांदुरा तालुक्यातील दहिगाव माटोळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वडी पिंपळखुटा धांडे लोणवाडी फाटा मालेगाव ते प्रमुख जिल्हा मार्ग ची विशेष दुरुस्ती करणे रुपये 3 कोटी 89 लक्ष विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार राजेश एकडे यांचे हस्ते माळेगाव गोंड येथे सकाळी 10 वाजता संपन्न झाला.
यावेळी आ.राजेश एकडे यांनी रस्ता हा विकासाचा मुलभुत घटक असुन यामुळे विकासाला चालना मिळते त्यामुळे रस्ता विकासाला प्राधान्य देवुन संपूर्ण मतदार संघातील रस्त्यांचा कायापालट करण्याचा आपला संकल्प असल्याचे प्रतीपादन केले. या भूमिपूजन समारंभाचे अध्यक्ष म्हणून माळेगाव गोंड येथील सरपंच सौ प्रतिभा रवींद्र वाकोडे ह्या होत्या. या प्रसंगी अँड.शालीग्रामजी कळस्कार जेष्ठ नेते भा.रा.काँ. श्री पद्म रावजी पाटील मुख्य प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा, वसंतराव जी भोजने उपजिल्हा प्रमुख शिवसेना, मोहन रावजी पाटील जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, भगवान भाऊ धांडे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, जनार्दन जी दांडगे माजी अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, डॉक्टर प्रदीप जी हेलगे माजी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, संजय चोपडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, आशाताई गोंड सदस्य जिल्हा काँग्रेस कमिटी, निलेश पाऊलझगडे सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी, दत्तात्रय गजानन गोंड उपसरपंच माळेगाव गोंड, हाजी गफ्फार शेख गनी आत्मा समिती नांदुरा, पांडुरंग तायडे काँग्रेस नेते, बंटी वनारे माजी अध्यक्ष युवक काँग्रेस, ज्ञानेश्वर डांबरे तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस, सुनीताताई गोंड प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती, ज्योतीताई होनाळे तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस, एकनाथ वक्टे राष्ट्रवादी काँग्रेस नेते , एकनाथ वक्टे युवा काँग्रेस नेते , अक्षय हेलगे मा.जिल्हा कार्याध्यक्ष विद्यार्थी राँ.काँ. , दिलीप वक्टे , विद्याताई ज्ञानेश्वर वक्टे सरपंच वडाळी, योगीताताई देवानंद सरदार उपसरपंच वडाळी, मलकापूर विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष श्री बंटी पाटील,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य पुरुषोत्तम झाल्टे, तालुका काँग्रेस कमिटी चे कोषाद्यक्ष शशिकांत गव्हाड, राँ.काँ. अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष बसिर खान ,अमोल बाठे ,देवानंद सरदार , सोपान वक्टे,नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक एकनाथ वक्टे, ,सरपंच पती रवींद्र वाकोडे,नांदुरा तालुका युवक काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते श्री जय सेन सरदार, ,पंकज थात्ते आणि समस्त महा विकास आघाडी चे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यासह माळेगाव गोंड येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.