
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
इस्लापुर :- इस्लापूर येथे वन जमिन धारकांचा मेळावा सुदाम पाटील यांच्या निवस्थानी, पंचशील झेंडा येथे संपन्न झाले,मेळाव्यात तालुक्याभरातुन वनजमिन धारक शेतकरी मोठ्या संख्याने उपस्थित होते,मेळ्याव्यात मोदी सरकारच्या जन विरोधी धोरनच्या विरोधात मेळाव्यात विश्वासघात दिवस साजरा करण्यात आला. मेळाव्याचे उद्दघाटन किसान सभेचे नेते काॅ.शंकर सिडाम यांनी केले, आपल्या भाषनातं त्यांनी वन जमिन धारकांच्या,गायरान जमिन धारकांचा जमिनी च्या मालकीसाठी कायदेशीर संघर्ष करण्यासाठी सज्ज होण्याचे अव्हाण केले.
तर मेळाव्याच्या अध्यक्ष काॅ.अर्जुन आडे होते, आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनांत त्यांनी अनुसूचीत जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्क मान्यता) अधिनियम २००६ ,नियम २००८ ,व सुधारित नियम १०१२ च्या कायद्याची आणि शासन निर्णयाची पाय्यामल्ली वन विभाग करत आहे ,वन अधिकार कायद्यानुसार वन दावे दाखल करणे,पडताळणी करणे,मंजूर अथवा ना मंजूर होणे ,अपीलाअंती निर्णय होणे, या सर्व प्रक्रिया झाल्या शिवाय वन जमिन कसत असलेला शेतकऱ्यांना वनजमिनी वरुन हिसकावून लावता येते नाही,पण वन विभाग स्वतः वन अधिकार कायद्याची पाय्यामल्ली करत असून, बेकायदेशीर पणे अतिक्रमण काढा मोहिम राबवत आहे,तातडीने हे वन जमीनीवरील अतिक्रमण मोहीम थांबवा असे मत इस्लापुर येथे झालेल्या जमिन हक्क मेळ्याव्यात व्यक्त केले.
वन अधिकार कायद्या प्रमणाने डिसेंबर २००५ च्या पूर्वी पासून ताब्यात असलेल्या वन जमीन चे मालक होण्यासाठी वन धारक पाञ असतात, शासन आणि प्रशासनाकडुन वन जमिनी ची मालकी देण्यात यावी,तसेच महाराष्ट्र शासन महसूल कायद्या प्रमाने गायरान, परमपोक सरकारी जमिन पिढ्यांन पिढ्या कसणाऱ्या शेतकऱ्यांना च्या नावे झाली पाहिजे ,सातबारा वरील पोटखराब जमिनी दुरूस्ती झाल्या पाहिजे,भोगवटदार जमिनी रूपांतर करुन द्या,हामीबावाचा कायदा करा अशी मागणी जमिन हक्क मेळ्याव्यात करण्यात आली, यावेळी मंचावर किसान सभेचे नेते काॅ.खंडेराव कानडे,काॅ.प्रभाकर बोड्डेवार, काॅ.अनिल आडे,काॅ.शिवाजी किरवले,काॅ.शेषराव ढोले,काॅ.विजय जाधव, काॅ.दिलीप तुमलवाड, काॅ.देविदास राठोड,काॅ.तानाजी राठोड, काॅ.लशिमन राठोड,काॅ.साईनाथ राठोड,काॅ.सुदाम पाटील ,काॅ.मनोहर नाईक, काॅ.अडलु बोनगीर, काॅ.यल्लया कोतगाम, काॅ.राम कंडले,काॅ.इरफान पठाण ,काँ.तुकारम पंधीलवाड
आदि उपस्थित होते.
मेळाव्याची सांगता जमिन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची,कसले त्याची जमिन मालकी झालीच पाहिजे,वन विभागाची दादागिरी बंद करा, या गगनभेदी घोषनांनी करण्यास आली.