
दैनिक चालु वार्ता
प्रतिनीधी द.नांदेड
बालाजी पाटील गायकवाड
नांदेड :- छावा श्रमिक संघटना व जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीने कोरोना सेवा योध्दा, कर्तृत्ववान महिलांचा, सामाजिक कार्यकर्ता,पत्रकार,मराठा ऊघोजक यांच्या सन्मान सोहळा विष्णुपुरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा 30जानेवारी रोजी संपन्न झाला. गेल्या 16 वर्षांपासून छावा श्रमिक संघटना व जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा 30 जानेवारी रोजी विष्णुपुरी येथील दत्तमंदिर संस्थान मध्ये घेण्यात आला.
यावेळी उध्दघाटक म्हणून संत बाबा हारजिंदर सिंग तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच राजु हंबर्डे,माजी ऊपसंरपच विश्वनाथ हंबर्डे ,माजी गट शिक्षणाधिकारी एम.आर.राठोड,टायगर गुप्र चे नांदेड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे सिनेट सदस्य उद्धव हंबर्डे, रामचंद्र शेबोले,हभप राम राऊत महाराज,सोम भारती महाराज, यांच्या सह मान्यवरांच्यी ऊपसिथीती होती.या वेळी आयोजक भास्करराव हंबर्डे यांनी प्रास्ताविक केले तर दिंगाबर शिंदे पाटील यांनी सुत्रसंचलन केले.
यावेळी मराठा ऊघोजक म्हणून विष्णुपुरी येथील तरूण ऊघोजक नरसिंग हंबर्डे , सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रदीप कुबडे,हरजिंदरसिंग संधु, गजानन कोकाटे, सुचित्रा जोगंदड,व पत्रकारिता साठी रमेश ठाकूर,निळंकळ वरळे,शाम जाधव, तिरूपती पाटील घोगरे,अनिल धमणे यांच्या व कोरोना योध्दा व कर्तृत्ववान महिलां विधा बापटे,विमल भिसे, संतोषी मनगोत्रा,ऊषा मुंडे यांच्या सह अनेकांच्या सन्मान पत्र, सन्मान चिन्ह ,शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.माधुरी हंबर्डे,संजय हंबर्डे, संतोष हंबर्डे,संदीप लुटटे,अजित मोरे, विशाल राठोड,व आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.