
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
पारनेर/गोरेगाव :- रविवार दि.३०जानेवारी रोजी मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे ७५लक्ष रुपयांच्या विकास कामांच्या भुमीपुजन प्रसंगी सभापती काशिनाथ दाते सर बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, पारनेर पंचायत समिती सभापती गणेशजी शेळके,माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव नगरे,माजी जिल्हा परिषद सभापती बाबासाहेब तांबे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना पक्षात माझे सहकारी जे खांद्याला खांदा लावून काम करतात त्यांनी सांगितलेल्या सूचना मी पुर्ण करण्याचा प्रयत्न केला याचा फायदा पक्षाला नक्कीच होऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला.माजी आमदार विजयराव औटी यांनी विकासाची घोडदौड तालुक्यात जशी चालू ठेवली तीच पुढे नेण्याचा प्रयत्न मी केला याचे समाधान नक्कीच आहे. बाबासाहेब तांबे यांनी त्यांच्या सभापती काळात फार मोठ्या प्रमाणात काम केले.
एखादे पद मिळाल्यानंतर त्याचा उपयोग आपल्या भागाला कसा होईल हेच पाहिले जाते. शिवसेना तालुकाप्रमुखांंचे भाळवणी गावातही फार मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली. बाबासाहेब तांबेनी गोरेगावचा चेहरामोहरा बदलून टाकला हे मानलेच पाहिजे. त्याच्या पाठपुराव्यानेच गेल्या दोन वर्षांत १.५० कोटी रुपयांची कामे गोरेगावला करता आली. यामध्ये गोरेगाव उंबरशेत,ठोकळशेत रस्ता ( ग्रामा_२७८) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ३० लक्ष रुपये, गोरेगाव वाघदरा रस्ता (ग्रामा_१५२) नवीन पुलासह डांबरीकरण करणे १५ लक्ष,गोरेगाव-पिराचा दरा रस्ता (ग्रामा_१९२) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १५ लक्ष,क वर्ग तिर्थक्षेत्र योजने अंतर्गत श्री गोरेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण करणे १५ लक्ष रुपये या कामांचा समावेश आहे.
यावेळी गोरेगावच्या लोकनियुक्त सरपंच सुमनताई तांबे, उपसरपंच पै. दादाभाऊ नरसाळे,ग्रा.सदस्य अनुसया नरसाळे,संपत नरसाळे,अण्णा नरसाळे,वामन चौरे, विठ्ठल नरसाळे, संदीप तांबे, विठ्ठल नरसाळे, शिवसेना युवा उपतालुकाप्रमुख ऋषी नरसाळे, संतोष नरसाळे, सुरेश चौरे,बाबा चौरे सर,शंकर तांबे, राजेंद्र नरसाळे, उद्योजक नागेश नरसाळे,विकास काकडे, रमेश तांबे, गणेश तांबे,इंजि.गणेश नरसाळे, उत्तम नरसाळे, बाळासाहेब पानमंद,श्रेयस तांबे,प्रभाकर नरसाळे सर,साहेबराव तांबे,अनिल नरसाळे, भाऊसाहेब नरसाळे,अनिकेत नरसाळे,रोशन पानमंद,भागा पाटील नरसाळे, राहुल तांबे,भाऊ नरसाळे,गोरख नरसाळे, संतोष नरसाळे,पांडा नरसाळे, सुभाष भांगरे,सुकलाल नरसाळे,बंडू तांबे, पांडुरंग नरसाळे, रविंद्र काकडे,संजय परभणे, अविनाश भांगरे, युवराज नरसाळे, उद्योजक अशोक नरसाळे,धोडक, राजू पठाण कामाचे ठेकेदार साहेबराव नरसाळे,इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप तांबे यांनी केले तर आभार सौ.सुमन तांबे यांनी मानले.