
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
दि.31 नांदुरा :- जि.प.उच्च प्राथमिक शाळा खडदगाव येथे कार्यरत सह.अध्यापक श्री विकास मुके सर यांना नुकताच जि.प. बुलडाणा तर्फे “जीवन गौरव ” पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त नांदुरा येथील मराठा युवा गृपच्या वतीने श्री विकास मुके सर यांचा सत्कार करण्यात आला. आजच्या काळात खरं तर पुरस्कारामुळे व्यक्तीचे महत्व वाढत नसुन .
योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळाले तर त्या पुरस्काराचे महत्त्व वाढते. असेच अष्टपैलु आणि खरे आदर्श शिक्षक असलेले विकास मुके सर यांना जिल्हा परिषद बुलढाणा चा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे जीवनगौरव पुरस्काराचे महत्त्व वाढल्याचे प्रतिपादन यावेळी मराठा युवा गृपचे मार्गदर्शक, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री धनराज सातपुतळे सर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संभाजीराव पाटील प्रणीत शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री निळकंठ सरोदे .
मराठा युवा गृपचे मार्गदर्शक श्री शिवशंकर शिंबरे सर,मराठा युवा गृपचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील.सदस्य श्री संतोष हेलगे, मोहन डीवरे ,अक्षय हेलगे, मदन जुणारे ,संतोष जुणारे , योगेश मनस्कार ,रामभाऊ सरोदे पहेलवान जुनारे ,दीपक कुटे, दत्ता पाटील ,विठ्ठल जुणारे धनंजय जुणारे ,प्रवीण देशमुख, अतुल कुटे, चेतन डीवरे, प्रकाश देशमुख व विश्वंभर वनारे हे उपस्थित होते.