
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
दि.31 निमगांव(नांदुरा) :- ग्राम पंचायतला घरकुल ‘ड’ याही प्रकाशीत झाली होती. सदर प्रतिक्षा यादी अल्फाबेट प्रमाणे होती मात्र आता तिच यादी अदला बदल करून नावे खालीवर करून प्रकाशीत करण्यात आली. हा बदल सतत कोणत्या कारणाने होतो? सदर यादी कोणत्या स्थरावर बदलण्यात येते? याबाबत तात्काळ लेखी स्वरूपात माहीती मिळावी.तसेच पूर्वीची अल्फाबेट अक्षराप्रमाने प्रकाशीत झालेली यादी कायम ठेवावी अशी विनंती आहे.
सदर प्रतिक्षा यादीतील घरकुलांमध्ये स्थानिक ग्रा.पं. प्रशासन भष्ट्राचार करणार असल्याचे समजून येते कारण ज्यांना खरोखर घराची गरज आहे.अशा निराधार लोकांना डावलून ज्यांचे पक्के घर आहेत अशा लोकांना आर्थिक लोभापोटी घरकुलाचे वाटप करण्यात आले आहे.करिता अंतीम निर्णायक यादी तात्काळ द्यावी व सदर बाबीची सत्यता पडताळूनच गरजू लोकांना घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी समाजिक कार्यकर्ते योगेश धोटे यांनी निवेदनाच्या माध्यमातून गट विकास अधिकारी यांना केली आहे.