
दैनिक चालु वार्ता
फुलवळ सर्कल प्रतिनिधी
नरसिंग पेठकर
अध्यक्षपदी प्रविण मंगनाळे तर सचिवपदी धोंडीबा बोरगावे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल दैनिक चालु वार्ता च्या पत्रकार कडून सत्कार करण्यात आला.
फुलवळ :- व्यावसायिक दृष्ट्या व्यापार , व्यापारी व गावाचा विकास करायचा असेल तर छोट्या मोठ्या व्यवसायिकांचे संघटन होणे गरजेचे असल्याची संकल्पना धोंडीबा बोरगावे यांनी मांडत गावातील सर्व व्यापाऱ्यांना एकत्रित येण्याची विनंती केली होती , त्यावरून सर्व व्यापारी एकत्रित येऊन काल ता.३० जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . याच बैठकीत सर्वांनी आपापल्या विचारांची देवाणघेवाण करत फुलवळ व्यापारी संघाची पहिली कार्यकारणी बिनविरोध जाहीर करण्याचा ठराव घेण्यात आला.
त्यानुसार पहिले अध्यक्ष म्हणून प्रविण मंगनाळे यांची तर पहिले सचिव म्हणून धोंडीबा बोरगावे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. कंधार तालुक्यातील फुलवळ हे एक राष्ट्रीय महामार्ग व एक राज्य महामार्ग असे दोन मुख्य रस्त्यावर आले असल्याने भविष्याचा विचार करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी फुलवळ मध्ये आठवडी बाजा