
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर :- रविवार दिनांक ३० रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त नितीन भैय्या जेथलिया यांच्या हस्ते एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किट वाटप करण्यात आले. गेल्या अनेक दिवसा पासून एस टी कर्मचारी हे कामावर नसल्याने त्यांच्यासमोर अनेक अडचणीचा सामना करीत असतांना त्यांचा कुटुंबांना आधार देण्यासाठी काँग्रेस पक्ष चे नेते नितीन भैय्या जेथलिया यांनी पुढाकार घेऊन एस टी कर्मचारी यांना रविवारी किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे.
सध्या कोरोना काळात गरीब गरजू कुटुंब अनेक अडचणीचा सामना करून उदरनिर्वाह करतात. कोरोंना काळात अनेकांच्या नौकार्या गेल्या रोजगार बुडाला तर एस टी कर्मचारी यांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला मात्र त्याकडे शासन मागण्या मान्य करीत नसल्याने व्यथित झालेल्या अनेकांनी आत्महत्या केल्या.
एस टी कर्मचारी यांना पाठिंबा मिळाला मात्र त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असल्याने अनेक कर्मचारी संकटात असतांना कुणाकडे आपल्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी गा-हणे मांडता जीवन जगत आहे. कुणी हताश होऊन जीवन जगत आहे. त्यांच्या भावना ओळखून जेथलिया परिवाराने किराणा किटचें यावेळी वाटप केले.