
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार :- जव्हार पत्रकार संघाची वार्षिक सर्व सामान्य बैठक शासकीय विश्रामगृह जव्हार येथे तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार संदीप मुकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीला तालुक्यातील ग्रामीण व शहरी असे दोन्ही विभागातील पत्रकार उपस्थित होते.सदर बैठकीत पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष मनोज कामडी यांनी एका वर्षात अध्यक्षपदी असताना आपल्याला आलेले अनुभव सांगून तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र यायला पाहिजे असे आवर्जून सांगितले.
या बैठकीमध्ये जव्हार तालुका पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्षांची निवड करताना जहीर शेख यांची सर्वानुमते निवड करून उपाध्यक्षपदी भरत गवारी,सचिव साईनाथ नवले तर खजिनदार पदी उबेद मेमन यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी सर्व नवनियुक्त कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी तालुका पत्रकार संघाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.या बैठकीदरम्यान बोलताना ज्येष्ठ पत्रकार संदीप मुकणे यांनी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकाच छताखाली येऊन काम करणे गरजेचे असून एकमेकांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेऊन सहकार्य करावे असा आशावाद व्यक्त करून नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणी निवडीच्या वेळी तालुक्यातील पत्रकार पारस सहाणे,संदीप साळवे,निलेश फलटणकर,प्रमोद मौळे,इमरान कोतवाल,दिपक काकरा हे पत्रकार यावेळी उपस्थित होते.