
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
रामेश्वर केरे
गंगापुरातील प्रकार : भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्यांना विचारला जाब
गंगापूर :- गंगापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्यांना कोंडून घेताच “पाणंद रस्ता मोजणी उद्याच होईल” असे लेखी आश्वासन कार्यालयातील अधिकार्यानी दिले. धामोरी (खुर्द) येथील उपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी आंदोलन मागे घेतले. तब्बल तासभर या कार्यालयात ठाण मांडून त्यांनी कडक शब्दात या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. धामोरी (खुर्द) गावातील पाणंद रस्ता मोकळा करावा म्हणून अनेकदा मोजणीची तारीख मागितली.
मात्र, संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत होते. याविषयी आमदार प्रशांत बंब यांनी आमसभेत तत्काळ रस्ते मोकळे करण्यात यावेत आशा सक्तीच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत. तरीही अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने धामोरी (खुर्द) येथिल उपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी शेतकर्यांसह आंदोलनाचा पावित्रा घेतला. याविषयी तहसिलदार सतीश सोनी यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला लेखी कळविले आहे की, गावातील शेतकरी शिवलाल कचरू मोरे व इतर शेतकरी यांनी गट क्र. ८६ व ९१ मध्ये जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
याविषयी आमच्याकडे सुनावणी देखील सुरू आहे. मात्र, रस्त्यासंबंधी खुणा व हद्दी कायम नसल्याने प्रकरणात निर्णय घेता येत नसल्याने सदरील प्रकरणात तत्काळ प्राधान्याने २० ऑगस्ट २०२१ पूर्वी खुणा व हद्दी कायम करून अहवाल सादर कराव्यात अशा सूचना तहसिलदार यांनी दील्या आहेत. सहा महीने उलटूनही भूमी अभिलेख कार्यालयाकडून कुठलीच प्रक्रिया न झाल्याने संतप्त उपसरपंच रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकर्यांनी अधिकार्यांना कोंडून घेत जाब विचारला.