
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजन नेते प्रा मनोहर धोंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड :- शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांचा वाढदिवस दि. २ फेब्रुवारी रोजी दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो.यंदा ही प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात दि. ३१-१-२०२२ रोजी शेवडी येथे व्हालीबाॅल च्या खुल्या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. मोहन अण्णा हंबर्डे ,शिवा सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष वैजेनाथ तोनसुरे, संपर्क प्रमुख इंजी अनिल माळगे , आदी उपस्थित राहणार असुन प्रथम बक्षीस ९९९९ रुपये, दुसरें बक्षीस ६६६६ रूपये,तीसरे बक्षीस ३३३३ राहणार, आहेत.
शेवडी बा. येथे दि.१-२-२०२२ रोजी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांचे उद्घाटन प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच दि. २-२-२०२२ रोजी लोहा येथे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. व नंतर लोहयातील ग्रामीण रुग्णालयात फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तेव्हा या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त जणांनी घ्यावा व या कार्यक्रमाला शिवा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवा संघटनेच्या वतीने शिवा संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष हनुमंत लांडगे, जिल्हा उपाध्यक्ष कालीदास मुस्तपुरे , व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोडके, सरपंच कैलास धोंडे, व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मानसपुरे , उपाध्यक्ष साधू पाटील वडजे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शुभम घोडके, आदीने केले आहे.