
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा शहरात वीरशैव लिंगायत स्मशानभूमीस लोहा न.पा.च्या वतीने नविन जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लोहा येथील समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांना लोहा येथील वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद केले की, सध्या जुन्या लोहयात असलेली स्मशानभूमीची जागा ही अपुरी पडत आहे. स्मशानभूमीत कुठेही नव्याने गार खोदायची असल्यास तेथे जुन्या मयत व्यक्तीचे अवशेष हाताला लागत आहेत.
त्यामुळे समाजमन हेलावून जात आहे. लोहा शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन वीरशैव लिंगायत समाजास स्मशानभूमीसाठी आहे त्या जागेच्या शेजारी किंवा इतरत्र उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीला लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरच तुमच्या प्रश्न मार्गी लाऊ असे आश्वासन दिले.या मुळे समाजाच्या वतीने नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांचे आभार मानले.
यावेळी लोहा बुलडाणा अर्बन बँकेचे म्यानेजर केशवराव शेटे साहेब सामाजिक कार्यकर्ते दता शेटे बाबाराव शेटे मल्कार्जुन काहाळेकर कैलास काहाळेकर हारीभाऊ शेटे ईश्वर कांजले बाळासाहेब कतुरे माधव वसमतकर सतिश आनेराव सचिन कोटे या सह बहुसंख्येने विरशैव लिंगायत समाजाची उपस्थिती होती. निवेदनाच्या प्रति जिल्ह्याधिकारी नांदेड, लोहा तहसिलदार,लोहा न.पा.चे मुख्याधिकारी यांना ही देण्यात आल्या आहेत.