
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
अनिकेत पुंड
औरंगाबाद :- राज्यातील मॉल आणि सुपरमार्केट मध्येही आता वाईन विकण्यास परवानगी असेल असा निर्णय राज्यमंत्री मंडळ्याच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला . यावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर राज्यभरातून टीकेची झोड उठवली जात आहे . विशेषतः भाजपने या निर्णयावरून शिवसेना आणि सरकारला धारेवर धरलं आहे. काही काँग्रेस नेत्यांनीही या प्रकाराची निंदा केली आहे . यातच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे . या निर्णयाअंतर्गत औरंगाबाद मध्ये ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल , ते दुकान मी स्वतः फोडणार, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे .
काय म्हणाले खासदार इम्तियाज जलील ?
महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या वाईन विक्रीच्या धोरणाला खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे . तसेच यावेळी त्यांनी केवळ टीका न करता सरकारला इशारा दिला आहे . ते म्हणाले , सरकारच्या या नियमानुसार ज्या दुकानात आधी वाईन येईल . ते दुकानच आम्ही फोडणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मी ही कृती करणार . शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतालाय , असं समर्थन सरकारच्या वतीने करण्यात येतंय . मग चरस आणि गांजाही शेतातच येतात . त्यालाची परवानगी द्या , अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार जलील यांनी व्यक्त केली .
महिला वर्गाला केले आव्हान –
खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारच्या या वाईन धोरणाविरोधात लढा देण्यास महिला वर्गालाही आवाहन केले आहे . आया बहिणींनी पुढे येऊन ही वाईनची दुकानं फोडली पाहिजेत , असेही खासदार जलील म्हणाले. भाजप , काँग्रेस या निर्णयाविरोधात फक्त निंदा करतायत , मात्र आम्ही प्रत्यक्ष कृती करून दाखवू . शहरात सरकारच्या नव्या धोरणा नुसार , वाईनचं दुकान उघडलं तर मी स्वतः दुकान फोडणार . असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी आयोजित पञकार परिषदेत दिला आहे .