
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार :- दिनांक ३१/०१/२०२२ रोजी अमावस्या असल्याने अमावस्येच्या काळात गुन्हेगार सक्रिय होऊन मालमत्ते विरुद्धचे गुन्हे करण्याची दाट शक्यता असते तसेच आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने समाज घटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच सण-उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात या या दृष्टिकोनातून दिनांक ३०/०१/२०२२ चे २३:०० ते ३१/०१/२०२२ ०५:०० वा. दरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात नाकाबंदी योजनेचे आयोजन करून अवैद्य शास्त्र बाळगणार यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करणे बाबत ची आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने दिनांक ३१/०१/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अमलदार नाकाबंदी व गस्त करीत असताना पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमी दाराकडून बातमी मिळाली की, सुलतानपूर ता. शहादा येथील दोन इसम बेकायदेशीर रित्या गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहे अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी म्हसावद पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी करीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदरची माहिती सांगून खात्री करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मसावद पोलिस ठाणे हद्दीत म्हसावद ते जळगाव रोडवर उमराणी फाट्याजवळ सापळा लावून बसलेले असताना दिनांक ३१/०१/२०२२ रोजी रात्री १२:०० वाजेच्या सुमारास दोन इसम येताना दिसले. त्यांना थांबवून त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) कृष्णा जनु पाडवी वय २१, २) अनिल भुर्या ठाकरे वय २० वर्ष दोन्ही रा. सुलतानपूर ता. शहादा जि. नंदुरबार असे सांगितले त्यांची झेडपी घेतली असता त्याच्या ताब्यात दहा हजार रुपये किमतीचे लोखंडी बनावटीचे पिस्तूल (गावठी कट्टा) मिळून आल्याने दोन्ही आरोपी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, रवींद्र कळमकर, पोलीस हवालदार विनोद जाधव, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, विकास कापुरे यांनी केली आहे