
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- आगामी महापालिका निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने लढविणार आहे. त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक आज दि.३१ रोजी मनसेच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत नेत्यांनी, शहरात मनसेच्या शाखा उदघाटनाचा जो धडाका सुरु आहे त्याचा आढावा घेतला. तसेच, शाखा अध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष यांची वैयक्तीक भेट घेऊन चर्चा केली, मनसे गट अध्यक्ष निवडीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे मनसे विद्यार्थी सेना, महिला सेना, वाहतूक सेना, चित्रपट सेना, सोशल सेल या सर्व प्रमुख विभागाची सविस्तर बैठक घेण्यात आली. मनसे शहराध्यक्ष गजन गौडा आणि आशीष सुरडकर यांनी जानेवारी महिन्याचा पक्ष कार्याचा अहवाल मांडला.
तसेच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा नेत्यांनी आजच्या बैठकीत घेतला. या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर नेत्यांनी मनसे नवीन कार्यकारणीच्या कामाचे कौतुक केले. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त पक्ष वाढीकडे लक्ष केंद्रीत करण्याचे आणि गट अध्यक्षांचे काम वाढवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
या बैठकीत अशोक पवार पाटील,राजू जावळीकर,संकेत शेट्ये,मंगेश साळवे,राहुल पाटील,प्रशांत दहिवाडकर,सागर राजपूत,रिना राठोड,दीपाली जैन,विद्या शिंगोड, शशी खंडागळे,अविनाश पोफळे,गणेश सोळुंके, राहुल रगडे,विजय गंगावणे, जॉन बोरगे,पप्पू खरे, प्रशांत जोशी रामकृष्ण मोरे,अनिल वाने, किरण जोगदंडे,मनीष जोगदंडे,निखिल मालू,प्रल्हाद लदिरे,चंदू नवपुते,रितेश देवरे,जयदीप लोखंडे, कौस्तुभ भाले,शेखर पाटील,आकाश खोतकर,गणेश ढगे,रशीद भाई,जयेश मेहेरा,संतोष मेहरा,बंटी पवार,रवी काळे,मंगेश दामोदर, रुपेश देहांडे,मंगेश वैदय,सुरेंद्र वाडेकर, अभय मांजरमकर,कमलेश राजकंडे, संतोष पवार,किरण पाटील, चिन्मय कुलकर्णी,प्रतीक गायकवाड,अनिकेत किल्लावर,राजेश पाटील नितेश जैन,रोहन वाघमारे,जय वावरे,अमित ठाकूर,विक्रम परदेशी,विजय वावरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.