
दैनिक चालु वार्ता
अर्धापूर प्रतिनिधी
मन्मथ राजेश भुस्से
अर्धापुर :- शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटनेच्या वतिने शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रिय अध्यक्ष प्रा.मनोहरराव धोंडे यांच्या पंचसुत्री कार्यक्रमातील धोरणानुसार संपुर्ण महाराष्ट्र भर शिवा संघटना शाखा पुर्नगठण अंतर्गत नुकतीच मरूळेश्वर मठ संस्थान अर्धापुर येथे अर्धापुर शहर शाखेचे पुर्नगठण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बोलतांना राज्य सरचिटणीस विठ्ठल ताकबीडे म्हणाले की शिवा संघटना ही काही केवळ राजकिय संघटना नसुन समाजातील तरुणांना वीरशैव लिंगायत सांप्रदायाचे आचार व विचार देऊन व्यसनमुक्त चारीत्र्य संपन्न जीवन जगण्याचा संदेश देणारी शिवा संघटना ही संस्कारक्षम सामाजीक चळवळ होय असे उदगार काढले.
आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार ओमप्रकाश पत्रे.हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे.तर सत्कार मुर्ति नवनिर्वाचित नगर पंचायत सदस्य प्र.राजेश्वर शेट्टे. नगर पंचायत सदस्य बाबुराव लंगडे.नगर पंचायत सदस्य प्र. विशाल लगंडे.यांचा शिवा संघटनेच्या वतिने सत्कार करन्यात आला यावेळी संघटनातुन समाजाला बळ मिळते समाजाचा विकास होतो तर समाजाचा विकास करुन घ्यायचा आसेल तर संघटनेच्या माध्यमातुन सामाजिक संघर्ष करुन समाजाची विकास कामे करुन घेतली. अशी माहीती वैजनाथ तोनसुरे यांनी दिली.
तर राजेश्वर शेट्टे.बाबुराव लंगंडे व विशाल लगंडे यानी पुनर्गठीत शहर शाखेस शुभेच्छा दिल्या यावेळी शिवा संघटना तालुका अध्यक्ष विलास कापसे.शिवसेना तालुका ऊपाध्यक्ष आशोक डांगे.शिवा संघटना तालुका ऊपाध्यक्ष संभाजी बासरे.शिवा संघटना शहर अध्यक्ष ओमप्रकाश नागलमे.शिवा विद्यार्थी आघाड़ी मां. तालुका अध्यक्ष अक्षय शेट्टे.शिवा संघटना तालुका सरचिटणीस साईनाथ लंगडे.मार्गदर्शक नितिन नागलमे. आतुल गोदरे.प्रविन डांगे.यांच्या ऊपस्थीत पुढील नवनिर्वाचित शिवा संघटनाअर्धापुर शहर अध्यक्ष म्हनुन शिवराज लंगडे.तर उपाध्यक्ष राहुल शेट्टे.सचिव शुभम पत्रे. सहसचिव अक्षय वाघमारे.
कार्याध्यक्ष शिवशंकर गोमाशे. सोशल मिडिया आशीष बासरे. संघटक सांरग जडे.सहसंघटक शुभम मठपती.कोषाध्यक्ष शिवशंकर वाघमारे. सदस्य गोविंद पत्रे.देवानंद वाघमारे.विजयकुमार पत्रे.अर्जुन वाघमारे.अनिल गोदरे.सोमनाथ लंगडे.लालजी लंगडे.सुमीत पत्रे.कार्तिक जडे.शिवहार पत्रे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विलास कापसे यांनी केले तर प्रास्ताविक शिवराज लंगडे तर सर्वांचे अभार साईनाथ लंगडे याना मानले