
दैनिक चालू वार्ता
मरखेल प्रतिनिधी
एकनाथ गाडीवान
देगलूर :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) , पुणेअंतर्गत समतादूत प्रकल्पाच्या वतीने समतादूत हाडोळे दिपाली व्यकंटराव यांनी संविधान साक्षर अभियान राबविले असून यासाठी आपल्या देगलूर तालुक्यातील मौजे होट्टल या गावाची निवड करण्यात आली होती . त्यानुषंगाने दिनांक 26 नाेव्हेंबर ते 26 जानेवारी 2022 या कालावधीत कोवीड-19 च्या अनुषंगाने शासनाच्या निर्देशाचे पालन या ठिकाणी शासन परिपत्रकानुसार प्रत्येक विषयावर कार्यशाळा व उपक्रम राबविण्यात आलेले आहेत .
यामध्ये संविधान दिन साजरा केले, संविधान प्रस्तावना सामुहिक वाचन केले, संविधानावर आधारीत प्रश्न मंजुषा, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या, संविधानिक मुलभूत हक्क व कर्तव्य प्रशिक्षण शिबीर घेतले, पर्याप्त प्रतिनिधीत्व आरक्षण याविषयी कार्यशाळा घेतली, अस्पृश्यता निवारण व जातीय सलोखा वृध्दिगंत होण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा 1989 सूधारीत कायदयाची कार्यशाळा घेतले, कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 या विषयी मार्गदर्शन घेतले, अंधश्रध्दा निर्मुलन व जादूटोणाविरोधी कायदा हक्क या बाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेतले.विविध शासकीय योजनाची माहिती दिली.
तसेच दिनांक 26 जानेवारि 2022 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केले आणि 31 जानेवारी 2022 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा होट्टल येथे संविधान साक्षरता अभियानाचे समारोप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.शेख मॅडम सरपंच, तर उपाध्यक्ष सौ. कोडेकर मॅडम, कार्यक्रमाची रुपरेषा समतादूत हाडोळे दिपाली व्यकंटराव यांनी केली . कार्यक्रमाचे सुञसंचलन सौ. बिरादार मॅडमनि केली. तर समारोप समतादूत नागनाथ कोलमारे सरांनी केले . तसेच होनमाने मॅडम,गोपच्छेडे सर, बिरादार सर, वासरी सर इतर मंडळी उपस्थित होते.