
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कंधार:- भागवत धर्माच्या झेंड्याखाली भक्तीची ज्योत प्रज्वलीत करण्यासाठी साक्षरतेच्या जगात, विज्ञानाच्या युगात, काळाच्या ओघात समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी मौ. शेकापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी मि पौष कृ. १२ शके १९४३ दि. २९/०१/२०२२ रोज शनिवार पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरूवात होत असून सांगता मि माघ शु. ५ दि. ०५/०२/२०२२ शनिवारी होत आहे. तरी पंचक्रोशितील सर्व भाविकभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री. माणिकराव बाबाराव निलेवाड, श्री. लिंबाजी बाबाराव निलेवाड,श्री. अॅड. दत्तात्रय माणिकराव निलेवाड,श्री. नामदेव माणिकराव निलेवाड,श्री. विठ्ठल लिंबाजी निलेवाड,श्री. नागार्जुन राजेश निलेवाड व समस्त निलेवाड परिवार,समस्त ग्रामस्थ मंडळी शेकापूर ता. कंधार जि. नांदेड यांनी केले आहे.या सोहळ्याचे स्थळ निलेवाड शेती फार्म, मौजे शेकापूर ता. कंधार जि. नांदेड हे आहे.सप्ताहातील कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:-
पहाटे ४ ते ६ काकडाआरती, स.७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, स. ११ ते २ भजनसंध्या, दु.२ ते ५,
श्रीमद भागवत कथा सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकिर्तन, रात्री १२ ते ४ हरिजागर भजन
१)वार शनिवार दि.२९/०१/२०२२ रोजी श्री.ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, आळंदी (देवाची) हे किर्तनकार आहेत.
२)वार रविवार दि.३०/०१/२०२२ रोजी श्री ह.भ.प. सौ. ज्योतीताई संगेवार, नांदेड हे किर्तनकार आहेत.
३)वार सोमवार दि.३१/०१/२०२२ रोजी श्री.ह.भ.प. सौ. रेणुकाताई देशमुख, उमरखेड हे किर्तनकार आहेत.
४)वार मंगळवार दि.०१/०२/२०२२ रोजी श्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कंधारकर हे किर्तनकार आहेत.
५)वार बुधवार दि.०२/०२/२०२२ रोजी श्री ह.भ.प.बाळकृष्ण महाराज दळवी, श्रीगोंदा, अ.नगर हे किर्तनकार आहेत.
६)वार गुरूवार दि.०३/०२/२०२२ रोजी श्री ह.भ.प.वामन महाराज पालमकर
हे किर्तनकार आहेत.
७)वार शुक्रवार दि.०४/०२/२०२२ रोजी श्री.ह.भ.प.सुगस महाराज चव्हाण, नांदेड हे किर्तनकार आहेत.
८)वार शनिवार दि.०५/०२/२०२२ रोजी श्री.ह
भ.प. रोजी नामदेव महाराज, पेठवडजकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद आहे.