
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- कै..गोविंदराव नागोबा पाटिल केंद्रे वय 87 वर्ष रा.शेकापूर यांचे दीर्घ आजाराने दि.30/01/2022 रोजी रात्री ठिक 7:40 वाजता दु:खद निधन झाले आहे. ते महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय शेकापूरचे संस्थापक अध्यक्ष तथा जि.प.नांदेडचे माजी सदस्य संभाजीराव पाटिल केंद्रे साहेब,प्रा.डि.एन.केंद्रे सर यांचे बंधू तसेच म.फु.विद्यालयाचे सचिव,शेकापूरचे माजी सरपंच शिवाजीराव संभाजी पाटिल केंद्रे,कंधार न.पा.चे माजी नगराध्यक्ष चेतनभाऊ केंद्रे,प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे, डाॅ.डि.एन.केंद्रे, वसंतभाऊ केंद्रे ,आर.एफ.ओ. माधवराव केंद्रे , प्रा.यु.पी.केंद्रे सर यांचे चुलते व वरिष्ठ लिपिक बालाजीराव केंद्रे यांचे वडिल होत.
त्यांच्या पच्छात दोन मुल व चार मुली नातु व नातवंडे आसा मोठा परीवार आहे. त्यांचा अंत्यविधी दि.31/01/2022 रोजी दुपारी ठिक 12:00 वाजता शेकापूर येथे त्यांच्या शेतात आंत्यविधी करण्यात आला. त्यावेळी राजकीय ,व्यापारी , प्राध्यापक ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व नातेवाईक मोठ्या प्रमानात उपस्थीत होते. केंद्रे परिवारास या दु:खातुन सावरण्याची ईश्वर शक्ती देवो .