
दैनिक चालु वार्ता
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी प्रतिनिधी
पिंपरी :- रिपब्लिकन सेना पिं.चिं. शहराच्या वतीने शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर गांधीनगर प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गांधीनगर प्रभागातील नागरी समस्या संदर्भात तीव्र आंदोलन करण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा,ड्रेनेज लाईन,आरोग्य समस्या महानगरपालिकेने तुर्तास मान्य केल्उ आहेत. त्यामुळे रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.
अशी माहिती शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांनी दैनिक चालू वर्ताशी बोलतांना दिली. या आंदोलनास कार्याध्यक्ष मुकुंद रणदिवे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष नसिम शेख, मौलाना संहिवाद शेख, दत्ता गायकवाड, सचिव कांचन जावळे, उपाध्यक्ष गिरीश सोनवणे, सचिव केशव गायकवाड, तळवडे प्रभाग अध्यक्ष हरिभाऊ गायकवाड, संतोष सोनवणे,प्रसिद्धीप्रमुख विष्णु बोर्डे, गांधीनगर प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.