
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री कंठीराम लुंगारे आज ३१ जानेवारी रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत झाले. कंधार शहरातील मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २१ जुलै १९८७ रोजी माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. कंधार येथील मनोविकास माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणुन होऊन गणितात प्राविण्य असल्यामुळे लवकरच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून सर्व विद्यार्थ्यात परिचित झाले. त्याचबरोबर संस्थेशी एकनिष्ठ असल्याने २० जुलै १९८९ रोजी त्यांना याच विद्यालयात कनिष्ठ प्राध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली.
गणिताचे प्राध्यापक म्हणून अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यात ते विद्यार्थीप्रिय शिक्षक झाले. त्यांना गणित शिकवण्यात आवड असल्यामुळे शाळेने ठरवून दिलेल्या वेळा पञकाव्यतिरिक्त जास्तीचा तास घेवून विद्यार्थ्यामध्ये गणिताविषयी असलेली भीती त्यांनी कायमची दूरच केली. त्यामुळे त्याचे विद्यार्थी आजमोठमोठ्या पदावर नौकरीस आहेत. ते आपल्या ज्ञानाच्या जोरावर ते हळूहळू विद्यालयातील पुढच्या पदावर जाऊ लागले. १ फेब्रुवारी २०१५ मध्ये विद्यालयात त्यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणि १ मार्च २०१६ पासुन ते उपमुख्याद्यापक पदी नियुक्ती करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळेत राबवलेले उपक्रम आणि त्यांनी विद्यार्थ्यासाठी घेतलेली मेहनत लक्षात घेवुन मनोविकास कर्मचारी पतसंस्थेकडून त्यांच्या कामाचे कौतुक करून कंठीराम लुंगारे यांना १ ऑगष्ट २०१७ रोजी त्यांच्यावर मुख्याध्यापक पदाची जबाबदारी टाकून मुख्याध्यापकपदी नियुक्ती केली. मुख्याध्यापक कंठीराम लुंगारे म्हणजे कंधार तालुक्यातील एक अष्टपैलू मुख्याध्यापक म्हटले तर वावगे ठरणार नाही.श्री कंटिराम लुंगारे सर नियमानुसार 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त मनोविकास शिक्षण संस्थेने त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला.
त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड.श्री बाबुराव पुलकुंडवार साहेब ,प्रमुख पाहुणे ऍड. लक्ष्मीकांत मुखेडकर साहेब, माजी नगराध्यक्ष रामराव पवार,श्री विकास बिडवई हे उपस्थित होते प्रास्ताविक श्री बंडेवार सर त्यांनी केली तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री बाळासाहेब पवार सर व जोशी सर यांनी भाषण केले.
सूत्रसंचलन तथा आभार श्री.घोडेकर सर उपस्थित सर्व शिक्षक तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.बंडेवार सर ,श्री.पुलकुंडवार सरश्री,मामडे सर,श्री.मोरे सर ,डोम्पले सर,श्री.तेलंगे सर ,श्री.वंगलवार सर,श्री.आवाळे सर,श्री.गणेश उगले सर व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते