
दैनिक चालु वार्ता
आटपाडी तालुका प्रतिनिधी
दादासो वाक्षे
वाक्षेवाडी :- वाक्षेवाडी गावांमध्ये खूप दिवसापासून प्रलंबित पडलेला पिण्याच्या पाण्याचा विजेचा प्रश्न अखेर मार्गी लागला. वीज वितरण कंपनीने 24 तास वीज दिली .याचे काम तीन महिन्यापासून सुरू होते ते आज पूर्ण होऊन याचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित भाजपचे नेते जयवंत सरगर तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी बालटे , गावचे सरपंच सौ.किरण वाक्षे, उपसरपंच आबासाहेब गलांडे, शंकर वाक्षे, शहाजी वाक्षे, ग्रामसेवक विजय मेटकरी, राजू जावीर, रासपचे विकास वाक्षे, दर्याबा गलांडे, दिलीप वाक्षे, आप्पा वाक्षे, मधुकर गलांडे, नाना कोकरे, विक्रम देवडकर, राजकुमार वाक्षे विनोद वाक्षे , नितिन वाक्षे, नानासो मोटे, प्रवीण मोटे, धनाजी पाटील ,श्रावण पावणे ,सयाप्पा ऐवळे