
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- प्राप्त माहितीनुसार अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पोही शेत शिवारातील पंकज मळसने यांच्या शेतात हरणाचा कळप जात असतांना पाच-सहा कुत्र्यांनी एका मोठ्या काळविटाला पकडून त्याला खूप जखमी केले.ही बाब रस्त्याने जात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्या काळविटाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले आणि लगेच कापूसतळणी येथील वन्यप्रेमी तथा कृषीमित्र अरुण शेवाणे यांना सागर उमाळे या शेतकऱ्यांनी फोन करून माहिती दिली.
अरुण शेवाणे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपले सहकारी प्रदीप सातवटे, प्रशांत सरदार यांच्यासह घटनास्थळी पोहोचले.दरम्यान त्या काळवीटाला तहान लागल्याचे ओळखुन त्याला पाणी पाजले व प्राथमिक औषध उपचार करण्याकरीता लघु पशु वैद्यकीय चिकित्सालय तालुकास्थळी नेण्यात आले. वन अधिकारी श्री.तायडे यांना फोनवर सदर घटनेची माहिती देऊन सदर जखमी काळवीटाला दवाखान्यात औषध उपचाराकरीता घेऊन त्याचा जीव वाचवावा अशी अरुण शेवाणे यांनी विनंती केली.
बचाव मोहीम गाडी सध्या हजर नसल्यामुळे आम्ही त्वरित या ठिकाणी येऊ शकत नाही असे वन अधिकारी तायडे यांनी सांगितले.प्राण वाचावे म्हणून दुचाकीवर नेण्याची परवानगी घेऊन लगेच अरुण शेवाणे व प्रदीप सातवटे यांनी लगेच पशु वैद्यकीय चिकित्सालय गाठले परंतु दवाखाना बंद होता. पाच दहा मिनिटाने वन अधिकारी श्री.तायडे व श्री.सोळंके हे डॉक्टर ला सोबत घेऊन आले आणि जखमी काळविटावर औषध उपचार करण्यात आला.अशाप्रकारे मरणावस्थेत असलेल्या काळवीटाचे दुचाकीवर नेवून त्याचे प्राण वाचविले.वनअधिकाऱ्यांनी आभार मानत अश्या वन्यजीव प्रेमी योध्दांनी बचाव मोहीम सुरू ठेवावी असे आव्हाहन केले.