
दैनिक चालु वार्ता
लोणखेडा सर्कल प्रतिनिधी
हिम्मत बागुल
शहादा :- शहादा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी याच्या हस्ते नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले. शहादा तालुक्यातील महिला बालकल्याण विभाग अंतर्गत नवीन नियुक्ती झालेल्या 4 अंगणवाडी सेविका व 26 मदतनीस यांना पंचायत समिती शहादा येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड.सीमा वळवी यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले.
तसेच कार्यशाळा घेत त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, पंचायत समिती सभापती बायजाबाई भिल, उपसभापती वैशाली पाटील, सत्यम मधुकर वळवी, चंदनताई पानपाटील, डॉ. सुरेश नाईक, किशोर पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा राठोड, बालविकास प्रकल्प अधिकारी रणजित कु-हे, बालविकास प्रकल्प अधिकारी फारूक शेख आदी उपस्थित होते.