
दैनिक चालु वार्ता
कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी
प्रदिप मडावी
कोरपना :- तालुक्यातील दि.३१जानेवारी २०२२ मौजा शिवापुर या छोठ्याशा अशा गोंडीयन संस्कृती जोपासणाऱ्या खेडेगावात मोठ्या थाटामाठात सल्लाशक्ती चिन्हाचे उदघाटन संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या नियोजनानुसार प्रमुख पाहुण्यांचे उपस्थीती सल्लाशक्ती यांच्या भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर सल्लेगागरा शक्ती स्थळावर प्रमुख पाहुण्यांचे हस्ते मुठपुजा व गोंडी सप्तरंगी झेंड्याचे ध्वजारोहन करण्यात आले.
तसेच आजच्या जिवनामध्ये माणुस वावरत असताना मानवाला तीन गोष्ठीची म्हणजे अन्न ,वस्ञ, आणि निवारा या तीन गोष्ठीची गरज आहेत.परंतु वाढत्या जगाच्या प्रादुर्भावामुळे मानसाची गरज सुद्धा वाढते.तर आपल्याकडे अन्न,वस्ञ, आणि निवारा पुर्तेच मर्यादीत नसुन मानसाच्या अंगी शिक्षण, संस्कार, आणि कला या तीन मुलभुत गोष्ठीची गरज सुद्धा असायला पाहीजेत. त्यानंतर आरोग्यविषयी थोडक्यात प्रास्तावीक संजय सोयाम समाजसेवक (माथा)यांनी केले.
तसेच भव्य सभेला तसेच पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी नियोजीत मान्यवर तिरू :- मेजर बंडुजी कुमरे तालुका अध्यक्ष गोंडवाना गणतंञ पार्टी कोरपना, तिरु :-संजय सोयाम सामाजीक कार्यकर्ते , लक्ष्मण कुळसंगे मुर्तीकार मांडवा ,नानाजी मडावी माथा, सोमलालजी कोहचाडे माजी सरपंच , मुकीनंदराव पा कुळसंगे गावपाटील ,सूर्यभान कोडापे देवारी ,रमेश पा गेडाम , भीमराव पा कुळसंगे ,शेकू पा शेडमाके राज्जू पा कींनाके ,वर्णू पा वेलादी ,महादेव पा मेश्राम ,भीमराव पा कोडापे व गावातील सर्व नागरिक उपस्थीत होते .