
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- अल्लू अर्जुन हा खरंतर साऊथचा सुपरस्टार. तिथे घराघरात त्याचे चाहते आहेत. पण त्याचा ‘पुष्पा’ सिेनमा हिंदी भाषेत प्रदर्शित झाला अन् बॉलीवूडचे सिनेमे मोठ्या आवडीने पाहणाऱ्या चाहत्यांनाही त्यानं आपलं वेड लावलं.’ सिनेमातील त्याच्या प्रत्येक संवादानं,संवादफेकीनं चाहत्यांची वाहवा मिळवली. सोशल मीडियावर तर त्याच्या ‘पुष्पा’ सिनेमातील संवादाची हुबेहूब नकल केलेल्या व्हिडीओ पोस्टचा नुसता पाऊस पडतोय.
इतक्या दिवसांनंतरही त्याच्या चाहत्यांचा उत्साह काही कमी झालेला दिसत नाही. सिनेमात त्याची आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री उत्तम रंगली आहे. सर्वांनीच या जोडीला मनापासून पसंत केलं आहे. आता ‘पुष्पा’ सिनेमाचा सीक्वेल करण्यात अल्लू अर्जुन व्यस्त असल्याचं बोललं जात आहे.